श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे सोलापुरात प्रथमच ब्राह्मण समाजातील शूर योध्यांना अभिवादन

By kanya News

सोलापूर : श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती-२०२४ यांच्यावतीने सोलापुरात प्रथमच ब्राह्मण समाजातील शूर योध्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि निष्ठावंत हिंदवी स्वराज्याचे शूरवीर योद्धे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यादिनानिमित्त एकत्र येऊन अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. २२ जुलै रोजी ब्राह्मण समाज सेवा संघ, डफरीन चौक, सोलापूर येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी आकाश कुलकर्णी (९५७९५६५०१५), अक्षय कट्टी (९७६३८११४३७) यांच्याशी संपर्क साधावा. समाजातील पाचवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाषण करायच असेल त्यांनी  आरती काशीकर (९९७५८८२५६६) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact