युवा अप्रेंटिंसशीप योजना: युवकाच्या हाताला  रोजगार देण्याचे काम सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतीपादन

 

परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरी :२०२४’ प्रदर्शनात  २०० स्टॉल्स उभारले

या प्रदर्शनात एकूण २०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यापैकी शासकीय विभागाचे  ५०, महिला बचत गटचे १५ स्टॉल आहेत. इतर महामंडळ, शेतकरी उत्पादक कंपनी, मिलेट उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रीय व औषधी पदार्थ, बियाणे खते औषधे कंपनी, ठिबक व तुषार सिंचन उत्पादक,कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तुंचे स्टॉल्स आहेत. कृषी पंढरी या प्रदशनाला हजारो शेतकरी, वारकरी व नागरिकांनी भेटी दिल्या. 

 

‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरी :२०२४’च्या  उद्घाटन   करताना  मुख्यामंत्री एकनाथ  शिंदे, पालकमंत्री  चंद्रकांत पाटील,  प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दत्तात्रय गावसाने, हरीष गायकवाड,  राजुबापू गावडे आदी.

By Kanya news

सोलापूर : युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे ६ हजार, ८ हजार आणि १० हजार दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार तसेच उद्योजकाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मुख्यामंत्री एकनाथ  शिंदे यांनी सांगितले.   कृषी उत्पन्न बाजार समिती व पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरी :२०२४’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, उपसभापती राजुबापु गावडे आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार  प्रशांत परिचारक यांनी  मनोगत व्यकत केले. प्रारंभी मुख्यमंत्री   शिंदे यांनी फित  कापून प्रदेशाचे उदघाटन केले. त्यानंतर प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact