By Kanya News
सोलापूर : येत्या दि. १७ जुलै, २०२४ रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळण्यासाठी प्रशासनास पूर्णत: व्यवस्था करण्याचे दि. १४ जून, २०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये मा.मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सुविधा व-व्यवस्था यांचे योग्य समन्वय व मार्गदर्शन करण्याकरीता मा.मंत्री महोदयांची “पंढरपूर आषाढी एकादशी वारी-२०२४” करीता “समन्वय समिती” गठीत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी, सोलापूर, उप सचिव तथा समन्वय अधिकारी (पंढरपूर आषाढी एकादशी वारी-२०२४),कार्यकारी अधिकारी, पंढरपूर देवस्थान, मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर व इतर संबंधित सर्व अधिकारी यांनी आषाढी एकादशी यात्रा-२०२४ संदर्भात प्रशासना मार्फत करण्यात येणाऱ्या सुविधा व व्यवस्थेबाबत वेळोवेळी समन्वय समितीस अहवाल सादर करावा. तसेच समितीने दिलेल्या निर्देशानुसार आषाढी वारी व्यवस्थेचे समन्वयाने नियोजन करावे, असे शासन निर्णय अन्वये कळविण्यात येत आहे.
समितीची संरचना पुढीलप्रमाणे असेल.
१) चंद्रकांत (दादा) पाटील, मा.मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि – अध्यक्ष
संसदीय कार्य) तथा पालकमंत्री, जि.सोलापूर
२) गिरीष महाजन, मा.मंत्री (ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन) – सदस्य
3) प्रा.डॉ. तानाजीराव सावंत, मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) – सदस्य