कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २९ ऑगस्ट २०२१-
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि गुरुविदया प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवार, दि. २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिनी मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्काराचे वितरण विणकर बाग साखर पेठ येथे करण्यात आले. यावेळी मनपा क्रीडाअधिकारी नजीर शेख, अॅड. रामचंद्र म्हेत्रस, लायन्स क्लबचे सोलापूरचे अध्यक्ष मोहन भूमकर, सोमशेखर भोगडे, चंदन चव्हाण, नंदकुमार शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे, नागेश करजगी ऑर्कीड स्कूलचे क्रीडाशिक्षक आनंद सिध्देश्वर लिगाडे , विवेक मिस्कीन , हॅप्पी डेज इंटरनॅशनल स्कूल कुंभारीचे क्रीडाशिक्षक विवेक मिस्कीन, सोलापूर जिल्हा स्पोर्ट्स कौन्सिल तायक्वान्दो असोसिएशनचे सचिव मंजूर शेख, जलतरणपटू रिया मुस्तारे यांना मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अॅड. रामचंद्र म्हेत्रस यांनी खेळाविषयी माहिती दिली. यावेळी विणकर प्रभात मंडळ चे सचिव कृष्णा गुरऺम, दत्तात्रय बोडा, पुरुषोत्तम दुस्सा, शंकर कनकी, इंदापुरे, चेगु, सत्यनारायण पसनूर, नागेश कनकी, लक्ष्मीकांत दंडी, गिरीश शकु, हिराचंद धुळम, चिप्पा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन लायन सोमशेखर भोगडे यांनी केले.
