सोशल मिडि याद्वारे गणेश अंकुशराव यांनी केले होते आवाहन
कन्या न्यूज सेवा, पंढर पूर, दि. २२ फेब्रु वारी :
पंढरपूर येथील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक अंबाबाई स्टॉप येथे एक वयोवृद्ध महिला आढळली. तिची विचारपूस केली असता ती महिला हरवल्याचे समजल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी सोशल मिडियाद्वारे सदरची महिला हरविल्याबबत आवाहन केले होते.त्यानंतर त्या महिले ची आपल्या कुटुंबीयांशी भेट घडली. दरम्यान, त्या महिलेसह तिच्या कुटुंबियांनी गणेश अंकुशराव यांचे आभार देखील मानले.

चंद्रभागेच्या पात्रात ती महिला आपले कुटुंबियापासून दुरावली होती. त्या महिलेचे वय 70 ते 75 च्या दरम्यान असून तिचे नाव मनुखा नामदेव धाड (तालुका- पुसद, जिल्हा- यवतमाळ ) असे आहे.दरम्यान महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती समजली . सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी कार्यकर्त्यांमार्फत रिक्षा पाठवली. चंद्रभागेत माणसं पाठवली. अनेक भागात शोधाशोध झाल्यानंतर अंकुशराव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाचा अवलंब केला. त्यांनी फेसबुक, व्हॉटस् अप च्या माध्यमातून आवाहन केले होते. त्यानंतर अखेर त्या महिलेच्या कुटुंबीयांशी भेट घडून आली. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव ,संपत सर्जे, महावीर अभंगराव आदी उपस्थित होते.