कन्या न्यूज सेवा ! सोलापूर, दि . ८ फेब्रुवारी २०२२ –
रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमवार, दि . ७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि . ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी सर्व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना प्रमुखांनी या लोकशाही दिनास वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
****