कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या (एसपीसीए) व्यवस्थापकीय समितीवरील 10 ते 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. इच्छुकांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सोलापूर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सोलापूर यांच्या नावे संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव 28 फेबुवारी 2022 पर्यंत पाठविण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए.सोनवणे यांनी केले आहे.
संस्था निकष:
जिल्ह्यातील गोशाळा/ पांजरापोळ संस्थापैकी एका संस्थेचा अध्यक्ष असावा.जिल्ह्यातील प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे 2 सदस्य असणार आहेत.जिल्ह्यातील एसपीसीए शासन सदस्य सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या 2 व्यक्ती असणार आहेत.जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे/ प्राणी कल्याणासाठी काम करणारे 5 ते 6 कार्यकर्ते समितीमध्ये असणार आहेत. आपले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर-413004 या कार्यालयाकडील डॉ. डी.ए.गिड्डे (9309131647) ई-मेल आयडी-ddchsolapur@gmail.com, dgidd7@gmail.com यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावेत.