सोलापूर,दि.3 फेब्रुवारी, कन्या न्यूज सेवा: शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 15 फेब्रुवारी 2022 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये
प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यास 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत देण्यात आलेली
होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून शासनाने महाडीबीटी
प्रणालीवर अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज आवश्यक त्या माहितीसह (उदा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गॅप सर्टिफिकेट, कॅप आयडी व प्रवेशपत्र इत्यादी) भरावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.