गणेश हॉल रेल्वे कॉलनी येथे चिल्ड्रन पार्क, ओपन जिमचे उदघाटन
सोलापूर रेल्वेचा स्तुत्य उपक्रम
BY KANYA NEWS
सोलापूर: मध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागातील, सोलापूर गणेश हॉल येथे नवीन चिल्ड्रन पार्क आणि ओपन जिमचे उद्धघाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सोलापूर कर्मचारी लाभ निधीच्या सौजन्याने या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते सर्व प्रथम पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणाले की, “रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिवारातील लोकांना काही वेळ निवांत बसण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आता या पार्कची स्वच्छता, निटनिटकेपणा ठेवण्याची जबाबदारी आता रेल्वे कॉलनी परिसरात राहणार्या सर्व रेल्वे परिवाराची आहे आणि त्यासाठी रेल्वे कॉलनीमधील सदस्यांनी एक समिती गठीत करून पार्कची व्यवस्था बघावी.”
सोलापूर: मध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागातील, सोलापूर गणेश हॉल येथे नवीन चिल्ड्रन पार्क आणि ओपन जिमचे उद्धघाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते झाले.सोलापूर: विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते सर्व प्रथम पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.सोलापूर: मध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागातील, सोलापूर गणेश हॉल येथे नवीन चिल्ड्रन पार्क आणि ओपन जिमच्या उद्धघाटनप्रसंगी नीरज कुमार दोहरे, डॉ. आनंद कांबळे, सचिन गणेरे, राहुल गौड, रामलाल प्यासे, आयुक्त आदित्य, पी. रामचंद्रम शेख मस्तान आदी.
यावेळी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. आनंद कांबळे, वरिष्ठ विभागीय अभियंता ( समन्वय) सचिन गणेरे, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता राहुल गौड, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे, विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी पी. रामचंद्रम, सचिव कर्मचारी लाभ निधी आणि सहायक कार्मिक अधिकारी शेख मस्तान आणि रेल्वे कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महावीर नेमानी (मुख्य वेल्फेअर निरीक्षक), टी. व्ही. वाघमारे (एससी \ एसटी सदस्य), संजय पवार (एनआरएमआयु सदस्य), संतोष गुरव ( सीआरएमएस सदस्य), हर्षल धात्रक ऑल इंडिया ( इतर मागासवर्गीय सदस्य ) आणि सुधीर कुमार सिंह यांनी केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते सर्व प्रथम पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.