कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्टगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भारतीय तलवारबाजी संघटना तसेच अध्यक्ष महाराष्ट्र तलवारबाजी संघटना सतीश ऊर्फ बंटी पाटील, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, शिवाजी विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, फेन्सिंग असोसिएशनचे सचिव उदय डोंगरे, फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव विनय जाधव यांच्यासह फेन्सिंग मार्गदर्शक, रेफरी व खेळाडू उपस्थित होते.