कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २२ ऑक्टोबर २०२१ –
दिंडोरी (जि. नाशिक) येथील राष्ट्रीय अजिंक्यपद व निवड चाचणी व्हालीबॉल स्पर्धेसाठी सोलापूरच्या सहा पुरुष खेळाडू व पाच महिला खेळाडू अशा एकूण अकरा खेळाडूंची निवड झाली आहे. यानिमित्त त्यांचा उद्योजक विलास लोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सावंत, सचिव फैजअहमद बेगमपुरे, जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सिद्राम कटगेरी उपस्थित होते. पुरुष खेळाडूंची नावे खालील प्रमाणे : शोएभ बेगमपुरे(कर्णधार), बसवराज धायगोंडे, सागर गायकवाड, ओंकार चक्रनारायण, भाऊ कापसे, हिरो शेख.
महिला खेळाडू: बुशरा अलीम (उपकर्णधार), अंकिता सोनवणे, अल्फिया शेख, मुन्नजा रंगरेज, शगुफ्ता जमादार.
या निवडीबद्दल त्यांचे राज्य असोसिएशनचे अध्यक्ष डी.बी. साळुंखे,असोसिएशनचे सरचिटणीस दीपक मोकल, खजिनदार अंकुश पाठक, सोलापूर जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे ,उपाध्यक्ष अहमद शेख, खजिनदार अफजल शेख, सहसचिव इकबाल दलाल, प्रसिद्धीप्रमुख अयाज शेख,सत्तार सय्यद, चेतन व्हनगुंडी, हर्षद जेलर, श्रीनिवास कामूर्ती, रफिक दिवाण,खुददुस बागवान यांनी अभिनंदन केले. असे
डायरेक्ट व्हॉलीबॉल असो.चे प्रसिद्धी प्रमुख अयाज शेख यांनी कळविले आहे.