कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २५ ऑक्टोबर-
सोलापूरच्या सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीचा डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम कोठारी याने मराठवाडा वाणिज्य महाविद्यालय, पुणे संघाकडून चंदीगड येथे झालेल्या ऑल इंडिया रेड बुल स्पर्धेत संघाच्या विजयात उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यामध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र ऐनवेळी त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो अंतिम सामना खेळू शकला नाही. मात्र तो अंतिम अकरा जणांच्या संघातील महत्वाचा खेळाडू होता. त्याचा संघ तीन लीग सामने, सेमिफायनल व अंतिम सामना जिंकून पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे .


