कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-


सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट संघटनेचे शिष्टमंडळ व्हा.चेअरमन किरण पवार यांच्या समवेत संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सु, प्रकाश भुतडा, उदय डोके यानी महाराष्ट्र क्रिकेट असो. सेक्रटरी रियाज बागवान यांची भेट घेवून रणजी व इतर सामने मिळण्याबाबत निवेदन दिले, त्यावर रियाज बागवान यांनीनी बीसीसीआयचे वेळापत्रक आल्यावर सोलापूरला रणजी सामना घेणारच, असे आश्वासन रियाज बागवान यांनी दिले.
त्या आगोदर इंदिरा गांधी स्टेडीयमची खेळपट्टी चाचणी करण्याकरीता सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असो. ने महापौर व आयुक्तांना लेखी निवेदन देवून सराव सामने खेळण्यासाठी परवानगी मागितली आह़े. रणजी सामने घेण्याआगोदर नुतनीकरण झालेल्या खेळपट्टंयाची सराव सामने चाचणी घेवून त्याचा दर्जा कसे आहे हा रिपोर्ट महाराष्ट्र क्रिकेट असो. व सोलापूर महानगर पालीकेस (क्रिडा खाते) देवू, त्यामुळे रणजी सामने व इतर सामने होण्यास सोयीस्कर होईल.
महाराष्ट्र क्रिकेट असो.चे सेक्रटरी रियाज बागवान यांना निवेदन देताना व्हा. चेअरमन किरण पवार, चंद्रकांत रेंबर्सु, प्रकाश भुतडा, उदय डोके आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र क्रिकेट असो.चे सेक्रटरी रियाज बागवान यांना निवेदन देताना व्हा. चेअरमन किरण पवार, चंद्रकांत रेंबर्सु, प्रकाश भुतडा, उदय डोके आदी उपस्थित होते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *