कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर २०२१-
सोलापूर : पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी बुधवारी शहरातील धोकादायक अशा सहा जणांना तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये चमनशहा टेकडी येथे राहणाऱ्या सालार कंपनीतील तिघांसह एमआयडीसी परिसरातील आशा नगर येथील तिघांचा समावेश आहे.

सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने साथीदारासमवेत गैरकायद्याची मंडळी जमवून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ, दनदाटी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या टोळीतील फैजल अब्दूल रहिम सालार, (वय-२७ वर्षे), मोहसीन अब्दुल रहिम सालार (वय-३८), मुस्तफा अब्दुल रहिम सालार (वय – २९ वर्षे) यांना तडीपार केले आहे.
तसेच साथीदारांसह आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, गोरगरीब निराधार महिला तसेच शाळा शिकणा-या अल्पवयीन मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांना फुस लावून पळवून नेणे, प्रसंगी त्यांना बदनाम करण्याची भिती दाखवून त्यांच्याशी संबंध ठेवणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या मल्लिकार्जुन कल्लप्पा आळगुंडगी ( वय-२७ वर्षे, अविनाश नगर), योगेश कुमार चोळ्ळे (वय-२१ वर्षे, आशा नगर), मॅडी ऊर्फ महादेव अशोक सरडगी ( वय-२३ वर्षे) या टोळीतील इसमांना सोलापूर शहर उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.