कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-
सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या विद्यमाने सोलापुरात दि. २७ ऑक्टोबरपासून १६ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सायंक जैन याची निवड झाली आहे. या स्पर्धा सोलापुरातील विजापूर रोड येथील भंडारी मैदान व पुष्प ग्राऊंड(डोणगाव) येथे होणार आहेत. हे सामने परभणी, हिंगोली, पुणे यांच्यात होणार आहेत. सोलापूर संघ सामने खेळण्यासाठी रविवार, दि. २४ रोजी नाशिकला रवाना होणार आहे. सोलापूर संघाचे सामने नाशिक येथे, नाशिक, औरंगाबाद व उस्मानाबाद यांच्यात होणार आहे. असे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी कळविले आहे.
