सन 2019 20 या वर्षीचा सोलापूर विद्यापीठाकडून देण्यात येणारा "बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स"
कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ३ सप्टेंबर २०२१-
सलग दुसऱ्या वर्षी संगमेश्वर महाविद्यालयाने डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषकाचा बहुमान पटकावला आहे. गतवर्षी झालेल्या सोलापूर विद्यापीठ अंतर महाविद्यालयीन स्पर्धा, आंतरविद्यापीठ स्पर्धेत सोलापूर विद्यापीठातील सहभागी संघात संगमेश्वर महाविद्यालयाच्या खेळाडूंचा समावेश व त्यामध्ये खेळाडूंनी मिळविलेले यश यासाठी असलेल्या गुणांकानुसार संगमेश्वर महाविद्यालयाने 453 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सर्व महाविद्यालयातून अंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता सोलापूर विद्यापीठाचे विविध संघ निवडले जातात या संघामध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील खेळाडूंचा समावेश असतो. आंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धेत ज्या 30 खेळांचा समावेश असतो. यामध्ये संगमेश्वर महाविद्यालय जवळपास २७ खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयचे संघ प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर विजेतेपद पटकावले आहेत, या सर्वांच्या जोरावर विद्यापीठाचा हा बहुमान संगमेश्वर महाविद्यालयाने सलग दुसऱ्यांदा “डॉ. पुरणचंद्र ;पुंजाल फिरता चषक “चा बहुमान मिळवला आहे. त्याच बरोबर गतवर्षी सोलापूर विद्यापीठात झालेल्या क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये सोलापूर विद्यापीठ सहभागी झालेल्या खेळ प्रकारात पदक मिळवले होते त्या सर्व संघांमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
याबद्दल सचिव धर्मराज काडादी कौतुक यांनी केले. या सत्कारासाठी प्राचार्य डॉ शोभा राजमान्य, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. आवटे, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील, उपप्राचार्य मेत्री, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एन. कुंटे, राहुल कराडे, वैजनाथ स्वामी, जिमखाना विभागप्रमुख प्रा. आनंद चव्हाण, रात्र महाविद्यालयाचे प्रा. शरण वांगी, प्रा. संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते हे उपस्थित होते. याप्रसंगी श्रेयस मालप, अमोल बळूर्गी, पावन पवार, समर्थ भिमरथी, संगमेश हिरेमठ, अबरार शेख, सोफियान पठाण, तन्वी शिंदे, विश्वजीत लोहार, राज घाटे, अनिरुद्ध कोरे, मेह्नाझ शेख, समृद्धी पाटील, ऋषिकेश मोरे, प्रमोद पवार या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.