कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर-
संजय सावंत यांनी एम.ए.शिक्षणशास्त्र (एम.एड.समकक्ष) परीक्षेत ८६.६८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंर्तगत कस्तुरभाई कॉलेज ऑफ एज्यूकेशन अभ्यास केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या एम.ए.शिक्षणशास्त्र (एनसीटीई व महाराष्ट शासनाच्या दि. १५ जूलै २०१६ च्या शासन निर्णयानूसार एमएडशी समकक्ष ) परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला आहे. त्यांना दोन्ही वर्षात चार सत्रात मिळून त्यांना ८६.६८ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांचे यत्नाळ जिल्हा परिषद शाळेचे चंद्रकांत सुरवसे यांनी अभिनंदन केले आहे.
