कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. २४ फेब्रुवारी :

पी.एस.व्ही ट्रस्ट संचलित श्राविका संस्थेत बहुउद्देशीय सभागृहात नीट-जेईई याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी त्याचे मेडिकल, इंजिनिअरला जाण्याचे स्वप्न सातत्यात उतरावे म्हणून श्राविका संस्था नीट व जेईई या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षाविषयी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य विलास लेंगरे यांनी दिली .


याप्रसंगी संस्था सचिव हर्षवर्धन शहा, प्रा.नागाश्रीनिवास, प्रा.शामसुंदर, प्रा.रविंद्र रेड्डी, मुख्याध्यापक मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ , प्राचार्य कांबळे यांच्या उपस्थितीत सरस्वती मातेचे दीपप्रज्वलन करण्यात आले
मुख्याध्यापक मोहोळे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नीट व जेईई या बद्दल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा. वृंदा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सो. मडविल यांनी केले.
या साठी प्रा.लोखंडे, माळी, सोनटक्के, पाटील, क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, बसप्पा कुंभार, हरी ऐवळे यांनी परिश्रम घेतले.

श्राविका संस्थेत नीट -जेईईवर आयोजित मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हर्षवर्धन शहा. त्याप्रसंगी प्रा.नागाश्रीनिवास, प्रा.शामसुंदर, प्रा.रविंद्र रेड्डी, मुख्याध्यापक मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ , प्राचार्य कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact