–नमो नमो यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांचे आवाहन
कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २५ ऑक्टोबर २०२१-
सोलापूरच्या नागरिकांनी दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंग न करता स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी, असे आवाहन नमो नमो यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांनी केले आहे.
अमेझोन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन कंपनीच्या माध्यमातून कपडे,मोबाइल, टीव्ही अशा इलेक्ट्रोनिक्स वस्तूची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. याचा फायदा स्थानिक व्यापारी आणि देशाला न होता विदेशी कंपन्यांना होत असतो. आधुनिक तंत्रज्यांनाच वापर करून सध्या जे ऑनलाइन खरेदी केली जाते, ते सोलापूरच्या स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी. जेणेकरून सोलापूरचा व्यापारी जगेल, व्यापारी जगला तर आपण जगू, सोलापूरच नाव टिकेल. दिवाळीच्या पाश्वभूमीवर कोणत्याही वस्तू ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक व्यापार्याकडून खरेदी करा, असे आवाहनही बडगू यांनी केले.