पुणे येथे झालेल्या १६०० गुणांकना खालील आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूर चेस अकॅडमीच्या तेरा वर्षीय वीरेश शरणार्थी याने उल्लेखनीय कामगिरी करत नऊपैकी साडेआठ गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाचे प्रथम क्रमांकाचे १,११,११० रुपयांचे पारितोषिक पटकावले.

कन्या न्यूज सेवा: सोलापूर दि. २५ जून:

पुणे येथे झालेल्या १६०० गुणांकना खालील आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूर चेस अकॅडमीच्या तेरा वर्षीय वीरेश शरणार्थी याने उल्लेखनीय कामगिरी करत नऊपैकी साडेआठ गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाचे प्रथम क्रमांकाचे १,११,११० रुपयांचे पारितोषिक पटकावले.
कै. भारतबाई हलकुडे यांच्या स्मरणार्थ आयोजित एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सवात भारतातील महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, ओरिसा, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह अमेरिका, इंग्लंड, सिरीया, श्रीलंका आदी देशातील ७४२ मातब्बर खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत ४९३ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंच्या सहभागामुळे पहिल्या फेरीपासूनच विजेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अकरा लाखाच्या भरघोस पारितोषिक असलेले या बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढती पहावयास मिळाल्या. पहिल्या फेरीतच पुण्याच्या आयुष डोळस याच्याशी बरोबरी झाल्यानंतर वीरेशने आक्रमक खेळ करत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू केयुर म्हेत्रे, अर्पित पासी, निहिरा दौंड, वीर शहा, इस्माईल खादर, हर्षल पाटील, पारस भोईसर यांना पराभूत केले. अंतिम फेरीत स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित सत्यम प्रकाश यांच्याशी झालेल्या अतिशय रंगतदार लढतीत मध्यपर्वात वीरेशने आक्रमक चाली रचत डावावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पटावरील निर्माण झालेल्या गुंता गुंतीच्या परिस्थितीत सत्यमने केलेल्या चुकीचा फायदा विरेशने घेऊन निर्णायक असलेली ही लढत जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले व आकर्षक चषक देखील पटकाविला. सासवड येथील खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत वीरेशने दमदार कामगिरी करत नऊपैकी आठ गुण प्राप्त करत स्पर्धेचे उपविजेतेपदासह रोख अकरा हजार रुपयाचे पारितोषिक देखील पटकावित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वीरेशला आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला वडील दयानंद शरणार्थी व आई शुभांगी शरणार्थी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
या यशाबद्दल त्याचे सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सचिव सुमुख गायकवाड, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, प्रशांत गांगजी, सौ. दिपाली पुजारी, गणेश मस्कले, निहार कुलकर्णी, विजय पंगुडवाले, प्रशांत पिसे, सौ. जयश्री कोंडा, सौ. रोहिणी तुम्मा, नागेश पाटील, विशाल पटवर्धन, रोहित पवार, श्रेयांस शहा, चंद्रशेखर कोरवी, युवराज पोगुल आदींनी अभिनंदन केले.

पुणे येथे झालेल्या १६०० गुणांकना खालील आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूर चेस अकॅडमीच्या तेरा वर्षीय वीरेश शरणार्थी याने उल्लेखनीय कामगिरी करत नऊपैकी साडेआठ गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाचे प्रथम क्रमांकाचे १,११,११० रुपयांचे पारितोषिक पटकावले.
वीरेश शरणार्थी
वीरेश शरणार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact