जिल्हा कुमार मुलींच्या खो खो स्पर्धेतील कामगिरी : किरण स्पोर्ट्स क्लब उपविजेता

कन्या न्यूज सेवा l सोलापूर, दि. २८ ऑगस्ट २०२१-

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबने जिल्हा कुमार खो-खो स्पर्धेतील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकाविले.
ह.दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात क्लबने येथील किरण स्पोर्ट्स क्लबवर २०-३ असा एक डाव १७ गुणांनी दणदणीत विजय मिळविला.

उत्कर्ष क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. विजयी संघास जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण व उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खजिनदार उमाकांत गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीरंग बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. शरद व्हनकडे यांनी आभार मानले.

निवड समिती सदस्य अर्जुन पवार, अतुल जाधव व सोनाली शिंदे यांनी निवडलेला संघ असा: प्रीती काळे, अमृता माने,रोहिणी काळे, साक्षी काळे, आरती काळे, संध्या सुरवसे, भाग्यश्री काळे (वाडी कुरोली), अर्चना व्हनमाने, साक्षी व्हनमाने, सादिया मुल्ला (किरण स्पोर्ट्स), प्राजक्ता बनसोडे (वेळापूर), श्रेया चव्हाण ( सन्मित्र क्लब), राखीव : शिवानी येंड्रावकर (वाडीकुरोली), स्नेहा निंबर्गी(किरण स्पोर्ट्स), जानवी शेटे( सन्मित्र क्लब). प्रशिक्षक : संतोष पाटील (मुली), राहुल माशाळकर (मुले).

विजयी वाडीकुरोली संघास जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण व उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खजिनदार उमाकांत गायकवाड हे शुभेच्छा देताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact