कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २४ ऑक्टोबर २०२१-
सोलापूर शहर उत्तरमधील लाल आखाडा तालीम कुस्ती केंद्र येथे कुस्ती मॅटचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. रविवार पेठेतील जोशी गल्लीतील कामगार कल्याण केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लाल आखाडा प्रतिष्ठानचे संस्थापक युवराज सरवदे, नगरसेवक हरिकांत सरवदे, पांडुरंग चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, गणेश सरवदे, किसन सरवदे, अमर दुधाल, शंकर शिंदे, दीपक चौगुले, क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सत्येन जाधव आदी उपस्थित होते.