कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २८ ऑगस्ट२०२१-
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि गुरूविद्या प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लायन्स क्लब सोलापूर सिटीचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
दि. २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडाडादिनानिमित्त यंदाच्या वर्षी चार क्रीडाशिक्षक आणि एका खेळाडूला हा पुरस्कार दिला जाणार आहे. उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, नागेश करजगी ऑर्कीड स्कूलचे क्रीडाशिक्षक आनंद लिगाडे, हॅप्पी डे इंटरनॅशनल स्कूल कुंभारीचे क्रीडा शिक्षक विवेक मिस्कीन, सोलापूर जिल्हा कौन्सिल तायक्वान्दो असोसिएशनचे सचिव मजूर शेख, जलतरण खेळाडू रिया मुस्तारे हे यंदाचे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या सर्वांचा मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार[ दि. २९ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७.१५ वाजता विणकर बाग, साखर पेठ सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिका क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अड. रामचंद्र म्हेत्रस,झोन सचिव लायन सोमशेखर भोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लबचे अध्यक्ष मोहन भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. तरी या कार्यक्रमास क्रीडा प्रेमी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आव्हान डॉ. लायन श्रुगांरपुरे, लायन चंदन चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ यांनी केले.
