कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-
राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत ईशा वाघमोडे हिने तीन सुवर्णपदक जिंकत हॅट्रीक मारली आहे. गेले पाच दिवस झालेल्या स्पर्धेत सोलापूरला पाच सुवर्ण, तीन रौप्य, एक कांस्य पदक मिळाले आहे.
ईशा वाघमोडे हिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात खेळताना हाय बोर्ड प्रकारात सुवर्ण जिंकून हॅट्रिक केली. त्याच गटात शुभांगी मर्चाला हिने रौप्य पदक जिंकली. त्यांना सोलापूर पोलिस ग्रामीण विभागाचे हेडकॉन्स्टेबल मनीष भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी सूर्यवंशी हिने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवली आहे. तीने तीन मीटर व एक मीटर प्रकारात स्प्रिंग बोर्ड प्रकरात दोन सुवर्ण व हायबोर्ड प्रकारात एक रौप्यपदक मिळवली आहे. सोहम आदीनोलू याने हाय बोर्ड प्रकारात रौप्य पदक तर पूर्वा लिगाडे हिने कास्यपदक जिंकली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.