कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २२ ऑक्टोबर २०२१-
रस्त्यावर गतिरोधक नसल्याने प्रभाग क्रमांक-२० मधील एका ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील प्रभाग २० मधील नई जिंदगी भागातील ललितानगर परिसरातील आयुष नरेश कोल्लुर असे मृत बालकाचे नाव आहे. प्रभाग क्रमांक-२० मधील ललितानगर याठिकाणी भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने तिचा जीव घेतला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. कोल्लुर कुंटूबीयांवर अचानक घडलेल्या प्रकारांमुळे दुखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे माहिती आली असता कोल्लुर कुंटुबियांना त्यांनी धीर देत मतदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर बालकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच महापालिकेच्या उदया होणार्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामध्ये महापालिकेकडुन कोल्लुर कुंटुबियांना अर्थिक मदतीची मागणी सभापती अनुराधा काटकर यांनी केली आहे. सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे तक्रार करुन संबंधित रस्त्याचे काम केलेल्या मक्तेदारांवर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर व त्यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी केली आहे.