कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ३० ऑक्टोबर-
स्टेट बँक ऑफ इंडीयात माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात ७ हजार ४२५सुरक्षा रक्षक पदाची भरती करावयाची आहे. सोलापूर जिल्ह्यातून बॅकेत 60 सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. सदर पदाकरीता सैन्य दलातून निवृत्त झालेल्या इच्छुकांनी दिनांक 02 नोव्हेबर 2021 रोजी पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय, सोलापूर येथे समक्ष भेट देवूननांव नोंदवावे असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्लॉमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कार्यालयात संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.