कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ११ फेब्रुवारी :- पंढरपूर येथे होणाऱ्या माघवारी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शहरातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
माघवारी यात्रा उत्सव-2022 निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 12.02.2022 रोजी पंढरपूर शहरातील सर्व एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलडब्ल्यू-2, नमुना ई-2, एफएलबीआर-2 मद्य विक्री व ताडी अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
पंढरपूर शहरातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारक, ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.