महानगरपालिका अंतर्गत अनुदानित खेळांसाठी प्राथमिक प्रवेशिका सुरुवात

By Kanya News

सोलापूर : सन २०२४-२५ च्या शालेय क्रीडा स्पर्धा सहभाग नोंदविण्यासाठी अनुदानित खेळांसाठी प्राथमिक प्रवेशिका ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे, असे क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांनी कळविले आहे.

 महानगर पालिकाअंतर्गत सर्व  शाळा,  क्रीडा शिक्षकांनी अनुदानित खेळात स्पर्धा सहभाग नोंदविण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेशिका भरून खेळाडूंची यादी तयार करण्यास सुरुवात करावी. प्राथमिक प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे, याची सर्वांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *