कन्या न्यूज सेवा: सोलापूर,दि. २३ ऑक्टोबर-
पार्क मैदानालगतचे सोलापूर महानगर पालिका क्रीडाधिकारी कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे. शेजारील ब्रीज असोसिएशनच्या कार्यालयात सध्या कामकाज सुरू असल्याचे मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी सांगितले.
स्मार्टसिटीअंतर्गत सोलापूर पार्क क्रीडांगणा क्रिकेट स्टेडियमचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. शेजारील मनपा क्रीडाधिकारी कार्यालयाचे सध्या काम सुरू असून, शेजारील ब्रीज असोसिएशनच्या कार्यालयात याचे कामकाज सुरू असून, सहा महिने अथवा हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा परत पहिल्या जागेत मनपा क्रीडाधिकारी कार्यालय सुरू होईल.
त्याचप्रमाणे जिमखाना, मुले पॅव्हेलियन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव या तिन्ही ठिकाणचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यात सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत तिन्ही ठिकाण खेळांडूसाठी जिमखाना, जलतरण तलाव आणि टेबल टेनिस हॉल हे उपलब्ध होतील.
सोलापूर महापालिका क्रीडाधिकार्यालयाच्या आस्थापनावर एकूण ३२ कर्मचार्यापैकी १६ कर्मचारी कार्यरत असून, १६ पदे रिक्त आहेत. यदृष्टीने हे कर्मचारी ३ जलतरण तलाव, २ इंनडोअर स्टेडीअम, २ जिमखान्यासह इतर क्रीडांगणे उदा. पार्क स्टेडियम, होम मैदान, पुंजाल मैदान व कर्णिकनगर येथील वल्याळ क्रीडांगण या सर्व क्रीडांगणाची देखरेख क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून होत असते. तसेच शहारातील जी आरक्षित क्रीडांगणे आहेत, त्याचे देखभालदेखील क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते. खासदर फंडातून बांधण्यात आलेले व्यायामशाळेचा विकाससुद्धा क्रीडा कार्यालयाकडून होत असते.
सध्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेबाबत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. जेंव्हा शासनाकडून आदेश प्राप्त होतील, आयुक्तांच्या आदेशानुसार शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील.’