कन्या न्यूज सेवा! सोलापूर, दि.२० ऑक्टोबर २०२१-
कामती येथे दसऱ्यानिमित्त आयोजित कामती चषक कुस्ती स्पर्धेत पैलवान बबलू जाधव विजेता ठरला. या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कामतीचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, अमर दुधाळ, दशरथ मिसाळ, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, समाधान वाघमोडे, आकाश फाटे, सोमनाथ राऊत, रवी सराटे, भोसले गुरुजी, सत्यवान घोडके, रवी शेळके, रमेश जाधव आदी उपस्थित होते. या स्पर्धा २५ किलो वजनीगटापासून ते ६० किलो वजनीगटापर्यंत अशा विविध गटांमध्ये घेण्यात आल्या. खुल्या ६० किलो वजनी गटात कामती चषक कुस्तीच्या अंतिम लढतीत बबलू जाधव याने सूरजवर मात करीत कुस्ती जिंकली. विजेत्याला मान्यवरांच्या हस्ते पाच हजार रुपये व गदा बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक मारुती खराडे, युवराज कारंडे, आदम शेख, आण्णा पवार, रमेश भोसले यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेसाठी कै.पै.विठोबा शहाजी दुधाळ-पाटील यांच्या स्मरणार्थ गदा व मिडल बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. धनराज भुजबळ, अंकुश आरकीले यांनी काम पाहिले. कुस्तीचे निवेदक अशोक धोत्रे सर यांनी केले.

