जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित 970 योजनांना मंजुरी

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. १३ नोव्हेंबर-

जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली.

             जिल्हा परिषद सोलापूर नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

              जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३८६० शाळा पैकी ३५९९ शाळांना व ४१८०  पैकी ४११६ अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळ जोडणी देण्याबाबत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

            सोलापूर जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत ८७४ योजनांचे आराखडे मंजूर आहेत त्यापैकी ५८ योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, त्या ५८ योजनाची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनाचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.  सन २०२०-२०२१ मध्ये सोलापूर जिल्ह्याचे कार्यान्वित १ लाख२३ हजार२७२ नळजोडणीचे उद्दिष्ट १०३ टक्के पूर्ण केले असून, सन २०२१-२०२२ मध्ये घरगुती व कार्यान्वित उद्दिष्ट ७५ हजार ५५१ होते त्यापैकी ३२ हजार ९७२ इतकेपूर्ण केलेले आहेत असेही त्यांनी सांगितले.

  जिल्हा परिषद सोलापूर नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact