कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २२ ऑक्टोबर २०२१-
कोजागिरी पौर्णिमेच्या प्रदोष काळात पद्मशाली पद्मावती देवी ब्रम्होत्सवम संस्था व अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघमच्या वतीने गांधी नगर येथील मल्लिकार्जून आरकाल यांच्या अक्षय ग्रँड फंक्शन हॉल येथे महाकुंकूम अर्चना आयोजित करण्यात आला.
महाकुकूंम अर्चन पौरोहित्य, वास्तू पंडीत पं. वेणूगोपाल जिल्ला (पंतुलू) यांच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक ही उपासना पूर्ण करण्यात आली. कुकूंम अर्चनाचे यजमान संस्थेचे अध्यक्ष गणेश पेनगोंडा व पद्मकमळ परिवारचे सौ व श्री गोपीकृष्णा वड्डेपल्ली, उद्योगपती सौ व श्री अंबादास बिंगी, सौ व श्री व्यंकटेश पडाल व सौ व श्री दतात्रय पोसा हे होते.
या उपासनेत सुमारे ११०० सुवासिनी महिलांनी भाग घेतला. अतिशय धार्मिक व मंगलमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहभागी महिलांनी लाल व भगवे साडी परिधान केली होती. विविध सौभाग्यालंकार घालून आलेल्या या महिलांनी अतिशय मनोभावे श्री लक्ष्मी यंत्राची उपासना पूर्ण केली. या महिलांनी श्री लक्ष्मी यंत्र महा कुंकूम अर्चना पूजा करून संपूर्ण परिवारासाठी सुख व समृद्धीची प्रार्थना करण्यात आले.
भव्य अशा स्टेजचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात येऊन श्री लक्ष्मीच्या मूर्तीची विधिवत पूजा व भव्य सामुहिक आरती करण्यात आली. त्यामुळे वातावरण मंगलमय व पवित्र क्षणांनी भरून गेले होते.
आलेल्या भाविकांना गोपीकृष्णा वड्डेपल्ली परिवाराच्यावतीने केसरयुक्त मसाला दुधपानची सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपूरी, अध्यक्ष गणेश पेनगोंडा, सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, सचिव व्यंकटेश पडाल, दतात्रय पोसा, पुरूषोत्तम पोबत्ती, रेणुकाताई बुधारम, नागेश सरगम, श्रीधर अंबाल, महादेव तुम्मा, पं. व्यंकटेश जिल्ला पंतुलू, पं. नागराज रासकोंडा पंतुलू, पं पुंडलिक ताटीपामूल पंतुलू, व पं. श्रीनिवास जिल्ला पंतुलू यांच्यासह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, भक्तगण व नागरिक बहुसंख्येने उपस्थिती होते.