कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २२ ऑक्टोबर २०२१-
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त श्री ओंकार आयुर्वेद न्युरोथेरपी आणि अँक्युप्रेशर मर्मबिंदू चिकिस्तालय आणि नमो नमो युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त आयोजित शिबिराचा ३५० जणांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते झाले. वैद्य डॉ. नरसिंहस्वामी मामड्याल, रूद्रेश बोरामणी, संगिता इंदापुरे , यशवंत इंदापुरे, राजू पाटील, सतिश सिरसुल्ला, संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू, शेखर इगे, प्रशांत इटकल, विनित गजेली, विश्र्वनाथ कट्टा, निलेश चिलवेरी, रमेश धावरकोंडा, अशोक मच्छा, विजय चिप्पा, लक्ष्मीकांत सरगम, राजु मामड्याल, महेश इंजामुरी, अनिल गुंजाळ, बालाजी धावरकोंडा, गौरी स्वामी, वन्शी यंनगदुल आदी उपस्थित होते. या शिबिरास सोलापूर शहर व जिल्हयासह बीदर, मंगळवेढा, पंढरपूर आदी भागातील रुग्ण सहभागी झाले होते.

