निरागस प्रेम

ती क्षणभर थांबली, तिने मागे वळून पाहिले…. एवढ्या आत्मीयतेने माझ्याकडे कोण पाहत आहे… असा विचार करताच पाहते तर तो एक उमदा तरूण होता, देखणा, सुंदर, राजबिंडा, डोळ्याचा तपकिरी रंग, क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि तीही त्याच्याकडे…

क्षणातच तो भानावर येऊन त्याने तिला विचारले आपले काय काम आहे…. 

ती –  आपल्या ऑफिस मध्ये क्लार्कची जागा भरणार आहे असे समजले..

तो –  हो..ना आहे तर… या..या..  मी आपले साहेबांची ओळख करून देतो..  दोघेही केबिनमध्ये जातात… 

तो –  मॅनेजरच्या खुर्चीवर स्वतः बसतात…

ती – सर… आपणच हो.. मीच… मिस्टर अविनाश सावळे..मीच मॅनेजर आहे…

ती- सॉरी हा सर…

तो – यस यस इट्स ऑल राईट….

ती – मी सीमा साने ..सध्या आपल्या ऑफिस मध्ये क्लार्कची जागा भरणार आहे असे समजले म्हणून मी अर्ज घेऊन आले आहे …मला नोकरीची आवश्यकता आहे तरी माझा अर्ज तसेच सर्टिफिकेट्स आणि कामाचा अनुभव दाखला पाहून आपण मलाही नोकरी दिलात तर बरे होईल… असे म्हणून तिने सर्व कागदपत्रे त्याच्या समोर ठेवते.

तो – तिचे कागदपत्रे पाहून .. आपले शिक्षण खूप  झाले असून …आपल्याला कामाचा ही बराच अनुभव आहे.. असे म्हणून त्यांनी बेल वाजवली.

शिपाई –  आत आला … 

तो –  हे पहा ह्या  सीमा साने यांना  बरोबर घेऊन तुम्ही मिस्टर देशपांडे यांच्याकडे  जा…

सीमा साने यांचे नियुक्तीपत्र  काढायला  सांगा…  व लगेच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यास सांगा …त्या उद्यापासून कामावर रुजू होतील.

ती : थँक्स यू सर … असे म्हणून स्मितहास्य करीत… केबिन बाहेर जाते..

ती –  तिच्या घरी जाते … तिची आई- वडील व एक लहान बहिण असे त्याचे कुटुंब…

वडील रिटायर्ड, बहीण शिक्षण घेत असते… नुसता पेन्शनवर घर चालत असते..

दोन मुलीच्या लग्नाची जबाबदारीमुळे तिचे आई-वडील  सतत अस्वस्थ असतात…

 ते विचार करीत बसलेले असताना… समोरून सीमाला हसतमुख चेहऱ्याने येत असलेले पाहून… सीमाला नोकरी मिळाली असे आशेचा किरण त्यांना दिसू लागतो.

ती – सीमा येऊन आई-वडिलांच्या पाया पडून वडिलांच्या हातात  नोकरीचे नियुक्तीपत्र  ठेवत बाबा मला नोकरी मिळाली आहे…आई – बाबा आता तुम्ही निश्चिंत राहा …

बाबा-  वा ..वा वा… फारच छान… त्या आनंदातच दुसरा दिवस कधी उजाडला कळालाच नाही..

त्या आनंदातच ती आईला सकाळी कामात मदत करून ऑफिसच्या वेळेत ऑफिसमध्ये जाऊन, कामावर रुजू होते.

तिचा ऑफिसात पहिलाच दिवस असल्यामुळे.. तिचे मन ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा व सरांचा स्वभाव कसा आहे ह्या विचारांनीच धास्तावूनच जाते.. परंतु ऑफिसमधील खेळीमेळीचे वातावरण पाहून ती फार आनंदी होते व त्या वातावरणात ती समरस होऊन जाते..त्यात दिवस व महिने कसे जातात हे तिला समजत नव्हते..

तो: अविनाश सर वरचेवर काहीना – काही निमित्ताने तिला केबिनमध्ये बोलवत असतात..

त्यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊन ते एकमेकांकडे आकर्षिले जाऊ लागले…

एक दिवस असेच अविनाश सरांनी त्यांना कामानिमित्त केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाले..

 सीमा आज आपण अबोली साडी नेसल्यामुळे व अबोलीचा गजरा घातल्यामुळे फार सुंदर दिसत आहात… हे ऐकून सीमाच्या चेहऱ्यावर लाली आली व ती लाजून तिची नजर एकदम खाली जमिनीकडे वळले.. हे मनमोहक सुंदर रूप पाहून सरांना राहवले नाही.. त्यांनी भारावून जाऊन एकदम खुर्चीतून उठून तिच्याजवळ जात… तिला हाताने जवळू घेऊन… तिला आपल्या जवळ  केले व त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले सीमा आय लव यु व्हेरी मच.. अनपेक्षित घटनेने ती गांगरून गेली व रागाने ती केबिनच्या बाहेर आली..आणि जणू काही घडलेच नाही असा अविर्भाव चेहऱ्यावर आणत.. स्वतःच्या टेबलावर जाऊन बसले. तेव्हापासून ती अविनाश सरांना टाळायचा प्रयत्न करू लागली.. तस..तसा अविनाश अस्वस्थ होऊ लागला.

तो – एक दिवस अचानकच रागातच शिपाईला बोलावलं… शिपाई घाबरतच केबिनमध्ये … हा साहेब.. साने ना ताबडतोब फाईल घेऊन माझ्याकडे पाठवा.

ती –  सर आत येऊ का?  

तो- ये बस… पहिल्यांदाच त्यांनी तिला एकेरी शब्दात उच्चारले …

तो – उठून तिच्याजवळ जात… तिच्या नजरेला नजर भिडवत… सांग तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का? .. माझ्या प्रेमाची शपथ घे… व खरं -खरं सांग मला काही वाईट वाटणार नाही..हे म्हणत असताना अविनाशचे डोळे पाणावलेले असतात…

ती – नाही नाही अविनाश सर ……. आपण विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहात?  मला तुम्हाला दुखवायचे नाही.. मला तुम्ही फार आवडतात… आय लव यु व्हेरी मच अविनाश सर…. 

तो: काय म्हणालीस अजून एकदा… मी स्वप्नात तर नाही ना…

ती- हो मी खरोखरच तुमच्यावर प्रेम करते… तशी ती एकमेकांना नकळत बिलगली.

त्या दोघांना ही कळलेच नाही प्रेमात वर्ष कसे उलटून गेले…..

तो – सकाळी ऑफिसमध्ये येताना सीमाचा गंभीर चेहरा बघून तिला…केबिन मध्ये बोलावलं… 

ती- गंभीर होत म्हणाली..ऑफिसमध्ये आपल्याबद्दल …कुज-बूज चालू आहे… प्रेम म्हणजे तीन तासाचा खेळ नव्हे… प्रेम म्हणटलं की लग्न आलंच… प्रेम विवाह म्हटले की विरोध आलाच… 

तो: अविनाश माहित आहे मला..

तो: मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे.. माझी पसंत आवडेल माझ्या आईला…

आई विरोध करणार नाही आपल्या या नात्याला हे निश्चितच …

ती- सर माझ्या घरची मंडळी कशावरून विरोध करणार नाही..

तो: देतील की परवानगी… का नाही देणार….

ती- या विषयावर पुन्हा बोलू.. कारण बराच वेळ झाला… मी तुझ्या केबिनमध्ये आहे निघते मी…

तो – आपण आता बाहेरच भेटत जाऊ… आज कुठे भेटशील…?

ती – नाही अविनाश आज नाही … आपण व्हॅलेंटाईन-डे लाचं  भेटू..कॉफी हाऊस मध्ये….

तो – त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता तुझी वाट पाहीन… 

ती – येते मी नक्की म्हणत …ती  केबिन बाहेर येते.

व्हॅलेंटाईन-डे दिवशी कॉफी हाउस मध्ये दोघे एकमेकांशी बराच वेळ गप्पा मारतात… प्रेम आंधळ असतं.. परंतु त्याबरोबर वेळेच भानही नसतं हे निश्चित…. ती तडकन उटते… अविनाश आपल्याला निघायला हवं…आई- बाबा वाट पाहत असतील….

दोघानाही कळलं नाही या नात्याला दिवसामागून दिवस सरले १८ महिन्याचा कालावधी संपूनही गेला या दरम्यान ….अविनाश च्या आईला सुगावा लागतो की आपल्या अविनाश सीमा साने नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे….

असेच एके दिवशी अविनाश ची आई म्हणते ….मला बातमी मिळाली… बरं 

तो – कसली बातमी मिळाली आई…

आई –  तुझ्या प्रेमाची…. कोण ती मुलगी ?, कोणत्या जातीची, खानदानी आहे का? आई-वडील  घराण् कसं तोला – मोलाचा पाहिजे हे ऐकून अविनाश म्हणतो… आई तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती… तेही खानदानी लोक आहेत… तू पाहशील तिला…

आई –  मला जी मुलगी पसंत पडेल तिच्याशीच तू लग्न करावयास पाहिजे…

तो : कदापि शक्य नाही.. मी लग्न करीन तर सीमाशीच …नाही तर मरेपर्यंत अविवाहित राहणार..

आई – अविनाश ला वारंवार व शांततेने समजावून सांगूनही त्याचा उपयोग होत नाही हे पाहिल्यावर ऑफिसमधील शिपाई तर्फे निरोप पाठवून….सीमा सानेना घरी बोलावून घेते… तेव्हाच सीमा  मनातल्या मनात घाबरते परंतु अविनाशच्या प्रेमामुळे अविनाशलान सांगताच  अविनाशच्या घरी जाते…

तो अविनाशचा आलिशान बंगला, त्याचा नावाचा लटकलेले बोर्ड, भलेमोठे गेट,  गेट बाहेर शिपाई उभा हे पाहून सीमा क्षणासाठी आवाक होते…

गेटवरील शिपाई कोण हवंय आपल्याला….

ती –  मला सावळे आईना भेटायचं आहे…

सीमा साने व शिपाई चा संभाषणाने अविनाशच्या आई बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून हीच सीमा साने असणार या खात्रीने शिपाईला तिला आत पाठवण्यास सांगते.. 

ती –  तसी ती दबकत – दबकत बंगल्याच्या हॉलमध्ये येते.

हॉल पाहूनच तिला अविनाशच्या अपार श्रीमंताची कल्पना येते… 

अविनाशची आई – ये ..ना ..ये…ना बस.. घाबरू नकोस?

ती – सीमा साने घाबरत खुर्चीवर बसते…  

आई – तूच सीमा साने बरचं  काही माझ्या कानावर आले आहे…

तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता म्हणे…

ती – साने चाचरतच …होय आम्ही एकमेकांवर नितांत प्रेम करतोय..!!!

अविनाश ची आई –  अस्स.…!!  तुझ्या आई-वडिलांना माहीत आहे काय?

ती –  नाही अजून मी तशी कल्पना दिली नाही..

अविनाश ची आई – देऊ पण नकोस…!!! मला आमच्या जातीचीचं  मुलगी सून म्हणून करावयाची आहे.. मला तुझे काही ऐकायचे नाही…. तुझे जर त्याच्यावर खरचं प्रेम असेल तर…

तू त्याला विसरून जा…. व त्याचा त्याग कर… मी त्याची जन्मदात्री आई आहे…

 माझा ही त्याच्यावर आई म्हणून  हक्क आहे…!!!

ती – तुमचे घराणे व श्रीमंती तुम्हालाच लखलाभ असो…

जिद्दीने जर मी लग्न करुन या घरात आले तर कोणीही सुखी राहणार नाही…

अविनाश आई –  मुली कठोर बोलले म्हणून राग मानू नकोस… शेवटी मला तुझे त्याच्यावर नितांत प्रेमाची कल्पना आलीच आहे… परंतु हा समाज, नातलग या सर्वांत मी बांधलेली आहे.. मला माफ कर…!!

तू केलेल्या प्रेमाचा त्याग हीच मला पुरेशी आहे..!!!   यापुढे तू अविनाशला उभ्या आयुष्यात कधी भेटणार नाही अशी मला वचन दे…..!!!

ती- यापुढे मी अविनाश ला आयुष्यात कधीच भेटणार नाही अशी मी तुम्हाला वचन देते…

सीमा ऑफिसमध्ये न जाता तडक घरी जाते.

तीन -चार दिवसानेच परगावच्या ऑफिसमध्ये मुलाखत देऊन कामावर रुजू होते.

कर्म-धर्म संयोगाने तिला तिच्या आई-वडिलांना त्याचे प्रेमप्रकरण सांगण्याची गरज भासली नाही.. आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढला की …बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही.. अशी थाप मारून वेळ मारून नेत असे…

शेवटी बहिणीचे पण लग्न होते. परंतु तिच्या आई-वडिलांची तिच्या लग्ना विषयीची काळजी दिवसेंदिवस वाढतच होती…अशाच एक दिवस लग्नाचा विषय निघाला की तिने स्पष्टपणे सांगितले की, मी लग्न करणार नाही… तुमच्या दोघांचे सेवा करणार.. लग्न झाल्यावर.. मी परस्वाधीन होणार …तुमची काळजी कोण करणार…!!!

इकडे अविनाशची आई – अविनाशला सारखे लग्न कर, मला सून हवी आहे असं लकडा लावीत होती… परंतु अविनाश काय ऐकत नव्हता..!!

सीमा अचानक ऑफिस सोडून का गेली… याचे कारण त्याला उमजेना..!!!

शेवटी अविनाश  शिपायाला तिच्या घरच्या पत्यावर पाठवतो…तेव्हा ती तिथे राहत नसल्याचे कळते…

 शिपायाला सराची अवस्था पाहावली नाही… 

 शिपाईने सरांना सांगितले की ,आपल्या आईसाहेबांनी सीमाताईंना …घर गड्यातर्फे निरोप पाठवून  घरी बोलवले होते…त्या आपल्या घरी गेल्या… परंतु त्या दिवसापासून त्या ऑफिसमध्ये आल्याचं  नाहीत.. हे ऐकल्याबरोबर आई आपल्याला लग्न कर.. म्हणून पिच्छा का पुरवते याची कल्पना अविनाश आली.

परंतु तरी मनावर संयम ठेवून त्याने आईचा प्रश्नांना खणखणीत उत्तर दिले.. यंदा कर्तव्य नाही…!!

 कारण सीमा वर प्रेम आहे… मी तिला कोणत्याही परिस्थितीत विसरू शकत नाही..

अविनाशची आई –  वरचेवर स्थळे आणीत होती. परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता..

कारण त्याला त्याच्या आईकडून  वदवून घ्यायचे होते की, तो लग्न का करत नाही…

आई अविनाश ला म्हणते –  अविनाश तू का लग्नाला टाळाटाळ करतोस..

अविनाश म्हणतो तुला माहित असायला हवे…

आई –  मला माहित आहे.. तू सीमा नावाच्या मुलीवर प्रेम करतोय… ती मला येऊन भेटली होती..

मी तिला स्पष्ट नकार दिलाय.. मी अपराधी आहे रे तुझी… मी हरले रे… पूर्ण हरले… कर तू सीमा शी लग्न शेवटी मुलाच्या सुखातच आई वडिलांची सुख असते.

तुझी ही अवस्था पाहून माझं हृदय गलबलय रे…

अविनाश – आता फारच उशीर झाला आहे आई… तिने केव्हाच ऑफिस सोडले, एवढीच काय ती गाव ही सोडून गेली…

आई – तू स्वतः जा.. 

अविनाश – आई आता त्याचा काही उपयोग नाही… दिवसामागून दिवस जात असतात..

अविनाश सीमाला विसरू शकत नाही.. ऑफिस मध्ये एकदम शांत, धीरगंभीर, सर्व ऑफिस स्टाफ त्याच्या दुःखाचे कारण विचारायचे धाडस कुणी करू शकत नाही…

तो लग्न न करायची स्वतःच्या मनाशी ठाम आहे…

एके दिवशी ऑफिस मधील सीनियर क्लार्क मिसेस कुलकर्णी धैर्य एकवटून साहेबांच्या केबीन मध्ये जातात सर 

अविनाश –  बोला कुलकर्णी मॅडम 

सर आपण रागावणार नसाल.. तर मला तुम्हाला विचारावसं वाटतं…

 सर – विचारा अगदी सरळ मनाने विचारा.. माझा राग-लोभ पार तळाला गेलाय. 

मिसेस कुलकर्णी – सर तुम्ही पूर्वी असे नव्हता… सर्वस्टाफ  बरोबर हसत- खेळत राहत होता.. मोकळेपणाने बोलत होता… परंतु सध्याच्या वागण्यामुळे आम्हा सर्व स्टाफला अवघड वाटतय..

सर कुठे हरवलाय तुमचा उत्साह… एकदा तुमच्या मनातलं दुःख काय आहे ते सांगून टाका..!!!

मन तेवढेच हलके होईल… मी बऱ्याच दिवसापासून आपल्या ऑफिस मध्ये काम करीत आहे… मला वाटते तो अधिकार मला आहे.. मी तुमच्या मोठी बहिणी सारखीच आहे..!!

अविनाश –  तोंडावरून हात ठेवीत.. स्वतःचे दुःख आवरत…

मॅडम तुम्हाला उगाच वाटतय… माझ्यात काही फरक झालेला नाही..

कुलकर्णी  मॅडम – साफ खोटं बोलताय सर.. सांगा सर माझी शपथ आहे तुम्हाला… 

सीमा साने आणि तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ना….!!! 

तेव्हापासून तुम्ही….!!!

अविनाश – हो.. तेव्हापासूनचं  माझी अशी अवस्था झाली… वार्‍याच्या झुळकी सरशी आली… व  माझ्या आयुष्यातून एकदम नाहीशी झाली…

कुलकर्णी  मॅडम – सर तुमच्या आयुष्यात ही घटनाचं घडली नाही, असे समजून तुमच्या आईसाठी तरी लग्न करा.

अविनाश –  नाही मॅडम …एखाद्या मुलीशी लग्न करून मी तिला सुखी ठेवू शकणार नाही… त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल…

कुलकर्णी  मॅडम-  सर आपण आपल्या मताशी ठाम आहात… मी काय बोलणार.. निघते मी सर ..

कुलकर्णी मॅडम केबीन बाहेर पडताच..

अविनाश – ड्रायव्हरला गाडी बाहेर काढण्यास सांगून घरी निघून जातात.

असेच वर्षानुवर्षे निघून जातात… तिथे सीमा व इकडे अविनाश दोघेही आपल्या मताशी ठाम राहिले व अविवाहित…एकमेकांच्या प्रेम- विरहात जीवन कंठीत असतात.

असेच एके दिवशी कुलकर्णी  मॅडम आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी गेले असताना… तिथे लग्नात सीमा सानेना अचानक बघतात…

 कुलकर्णी  मॅडम –  आपणचं सीमा साने ना… व्हाट ए  ग्रेट सरप्राईज…अविनाश उभे आयुष्य तुमच्या आठवणीत व वाट पाहण्यात घालवले बरे…

आपण कोठे उतरलात …  तुमच्या दोघांची भेट झाली की, माझ्या मनाला शांती मिळेल.

सीमा – मी या कार्यालयातच उतरले आहे…

कुलकर्णी मॅडम  –  वा फारच छान..!! 

तुम्ही वाट पहा मी अविनाश सरांना घेऊन येते…!!!

परंतु सीमाच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात.

कुलकर्णी मॅडम-  सीमा तू कुठे हरवलीस..!!

ती –  नाही हो…  मी अविनाशच्या आईला…!! अविनाशला उभ्या आयुष्यात कधीही भेटणार नाही असे वचन दिले आहे. माझ्या आई-वडिलांना यातले काहीही माहित नाही.. उगाचच हे कळाले तर त्यांना धक्का बसेल व ते दुखावले जातील. कारण मी त्यांना तुम्हा दोघांची सेवा करण्यासाठी लग्न करणार नाही हे सांगितले आहे.

हे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी हिताचे राहील. उगाच संघर्ष नको जे आहे ते सत्य आहे, ती पचवायची ताकद माझ्यात आहे, आणि ते अविनाश व माझ्यासाठी हिताचे राहील न जाणे कदाचित आम्ही पुढच्या जन्मी भेटू…..!!!

 कृपया, कुलकर्णी मॅडम वाईट वाटून घेऊ नका.. हा माझा अंतिम निर्णय आहे..!!

कुलकर्णी मॅडम  – आश्चर्यचकित झाल्या… त्यांच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर आले..

किती निरागस प्रेम… वा मानलं..!!!!

स्वलिखित: श्रीमती आशा चंद्रकांत कुमणे, सोलापूर.

(मोबाईल: ९३२५५१८६७७ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact