कन्या न्यूज सेवा; सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर २०२१-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाजे (दिंडोरी, जि. नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपीन चहल, आमदार नितीन पवार, आमदार मंजुळाताई गावीत, नाशिक क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय महाडिक, डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे राष्ट्रीय सिनिअर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डी. बी.साळुंखे, राष्ट्रीय असोसिएशनचे महासचिव विक्रम सिंह, महाराष्ट्र असोसिएशनचेचे महासचिव तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्य दीपक मोकल, खजिनदार अंकुश पाठक, राष्ट्रीय सहसचिव मीनू मानव, सरपंच वसंत भोये आदी उपस्थित होते.

दिवसभर झालेल्या पुरुष गट साखळी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
1) मध्यप्रदेश संघाने ओरिसा संघाचा 22-20 अशा सेट मध्ये पराभव करीत विजय संपादन केला. 2)मुंबई संघाने राजस्थानचा संघाचा 21- 6 सेटमध्ये पराभव करीत विजय संपादन केला.3) तामिळनाडू संघाने दीव दमन संघाचा 21-13 या सेटमध्ये पराभव करीत विजय संपादन केला.4) चंदीगड संघाने महाराष्ट्र पोलीस संघाचा 21- 14 सेटमध्ये पराभव करीत विजय संपादन केला.5) गुजरात संघाने महाराष्ट्र येलो संघाचा 21- 10 सेटमध्ये पराभव करीत विजय संपादन केला. 6)विदर्भ संघाने कर्नाटक संघाचा 21 -10 सेटमध्ये पराभव करीत विजय संपादन केला.


या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुसज्ज अशी चार मैदाने तयार करण्यात आलेली असून या स्पर्धेसाठी भारत देशातून पुरुषांचे 24 संघ व महिलांचे 12संघ सहभागी झाले आहेत.या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची निर्मिती केली असून राष्ट्रीय अध्यक्ष मा.विपिन चहल व महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र असो. चे अध्यक्ष डी. बी.साळुंखे, सरचिटणीस दीपक मोकल व खजिनदार अंकुश पाठक यांनी या स्पर्थेत महाराष्ट्र राज्याला यजमान पदाची संधी मिळवित अतिशय सुंदर आणि देखणे नियोजन व आयोजन केले आहे. त्यांनी महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांच्या सहकार्यामुळेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा घेणे शक्य झाले आहे अशी प्रतिक्रिया दिली. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव दीपक मोकल यांनी केले. सूत्रसंचालन शरद कुंभार यांनी केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे सहसचिव जगन राऊत , अशोक गोरे, निवड समिती सदस्य फैजअहमद बेगमपूरे, राष्ट्रीय स्पर्धा नियंत्रक संजय सावंत यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे पंच प्रमुख रविंद्र म्हात्रे, राज्य संपर्क प्रमुख नामदेव जोपले, नाशिक असोशिएशनचे अध्यक्ष यशवंतराव डिकले, सचिव सुरेद्र राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाजेचे मुख्याध्यापक संजीव निकुंभ व विविध समित्यांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पंच म्हणून प्रसन्न पाटील, शरद कुंभार, यतीराज पाटील, दर्शना शिंदे, गुरुनाथ पाटील, राजेंद्र मागाडे, अंतोष हस्ते, हिरामन भोईर, बब्रुवाहन गायकवाड व गजानन पाटील हे काम पाहत आहेत.असे महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल असो.चे प्रसिध्दीप्रमुख बसवराज धायगोंडे यांनी कळविले आहे.

नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगीचे छायाचित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact