कन्या न्यूज सेवा! अक्कलकोट, दि,१८ ऑक्टोबर-
केएलई सोसायटी संचलित अक्कलकोटातील मंगरुळे प्रशालेचे १९९१-९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक आर.आय स्वामी होते. प्रारंभी निधन झालेल्या शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी व्हा व्हॉट्सअप, फेसबुकवरून माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण परिचय देऊन शाळा व गुरुजनां बद्धल कृतज्ञता व्यक्त केली. मोठया हुद्यावर असणारे विद्यार्थी बालपणातील आठवणीत रमले\ जुन्या,कडू-गोड आठवणीने त्यांचे डोळे पाणावले.
मोठ्या हुद्यावर काम करणारे डॉक्टर,इंजिनिअर, उद्योगपती पाहून गुरुजन भारावून गेले होते. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक एस.टी.पाटील ,मुख्याध्यापक गिरीष पट्टेद, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. इचगे, स्वामींनाथ हरवाळकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किसन राठोड ,नंदिनी निंबर्गी, प्रकाश पोतदार ,प्रा. मैनूद्दीन गौर, प्रशांत मगदूम, विक्रांत राठोड, सुभाष पवार, रमेश राठोड, किरण पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास देवराज शटगार ,कल्याणी कांबळे, सुरेश वाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रफुल्ल इचगे यांनी केले.




