सोलापूर,दि. 3 फेब्रुवारी, कन्या न्यूज : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छुक संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव 11 फेब्रुवारी 2022 पूर्वी पाठविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी केले आहे.
अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील शासन परिपत्रकानुसार पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र संस्थांनी सन 2021-22 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांच्याकडे सादर करावेत. 11 फेब्रुवारी 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.