कन्या न्यूज सेवा : सोलापूर, दि. २८ ऑगस्ट २०२१-
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला रविवार,दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजता क्रीडा संघटकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक लक्ष्मण ढेरे यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अजित संगवे, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक नासीर आळंदकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशालेच्या खो-खो मैदानावर आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.