निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची माहिती
कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि.१६ ऑक्टोबर – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना ५० हजार रुपये आर्थिक मदत वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा तपशील लवकरच प्रसिध्द करणार आहे. याबाबत मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.