इ. स. पूर्व काळातील तांबे, चांदीच्या नाण्यांचा समावेश

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. 1 ऑक्टोबर 2021-

उद्योजक किशोर चंडक यांनी १९६३ पासून संग्रह केलेल्या इ. स. पूर्व काळातील ऐतिहासिक 100 पुरातन नाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट म्हणून दिली आहेत. इ. स. पूर्व 500 वर्षांपूर्वी पासून ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या नाणी त्यांनी विद्यापीठातील संग्रहालयासाठी दिल्या आहेत. त्यामध्ये चांदी, तांबे आदी नाण्यांचा समावेश आहे.

उद्योजक चंडक यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुरुवातीला 35 नाणी सुपूर्द केली आहेत. आणखीन 65 नाणी जमा करणार आहेत. ऐतिहासिक व अनमोल ठेवा चंडक यांनी विद्यापीठासाठी दिल्याने कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. चंडक यांना लहानपणापासून ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह करण्याची आवड आहे. १९६३ पासून त्यांनी देशातील विविध प्रांतातून नाणी जमा केली आहेत. या नाण्यांचे त्यांनी व्यवस्थितरित्या लॅमिनेशन करून त्यात मराठी व इंग्रजी भाषेमध्ये त्याची माहिती दिली आहे. त्यांनी जपून ठेवलेला व संग्रह केलेला हा ऐतिहासिक ठेवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी भेट स्वरुपात उपलब्ध करून दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीदेखील काही नाणी आहेत, तीही विद्यापीठास देणार असल्याचे चंडक यांनी सांगितले.

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक्रमासाठी नाण्यांचा एक स्वतंत्र विषय आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये पुरातत्व संग्रहालय उभारले आहे. यामध्ये विविध शिल्प, पुरातन वस्तू आहेत. नाण्यांची कमतरता होती. ती आता चंडक यांनी उपलब्ध करून दिल्याने विद्यापीठातील संग्रहालय समृद्ध झाल्याची भावना या विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी व्यक्त केली आहे. सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनीही आनंद व्यक्त करत चंडक यांचे आभार मानले आहे.

किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट
उद्योजक किशोर चंडक यांनी इ. स. पूर्व काळातील ऐतिहासिक पुरातन 35 नाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact