दि. १ जुलै १९६२ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते पाया रचलेल्या सोलापुरातील सम्राट चौक येथील उमाबाई श्राविका विद्यालयास ६० वर्षे पूर्ण झाले. उमाबाई श्राविका विद्यालयाने हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले.

कन्या न्यूज सेवा : सोलापूर, दि. 3 जुलै : उमाबाई श्राविका विद्यालयाचा दि. १ जुलै २०२२ रोजी श्राविका संस्थेचे शिल्पकार सु.श्री. ब्रम्हचारी राजुलमती शहा, पंडिता सुमतीबाई शहा, पंडिता विद्युल्लता शहा, स्व. रतनचंद शहा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून हिरक महोत्सवी वर्षे साजरा करण्यात आला.
श्राविका संस्थेच्या प्रथम संस्थापिका सु.श्री. ब्रम्हचारी राजुलमती शहा ( निम्बर्गीकर) यांच्या अध्यक्षतेखाली व पंडिता सुमतीबाई शहा यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रथम मुख्याध्यापिका पंडिता विद्युलता शहा स्व.रतनचंद शहा यांच्या प्रेरणेतून मार्गक्रमण करणाऱ्या उमाबाई श्राविकेचा हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले.
*या हिरक महोत्सव प्रसंगी श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, श्राविका संस्थेच्या सी.ई.ओ. देवई शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशालेचे जेष्ठ सहशिक्षक सुकुमार वारे यांनी श्राविका संस्थेच्या वाटचालीचा इतिहास शब्द सुमणांनी प्रकट केले.
सूत्रसंचालन प्रशालेचे सांस्कृतिक प्रमुख अनुप कस्तुरे यांनी केले. आभार प्रदर्शन अनिता पाटील यांनी केले.
प्रशालेचे कलाशिक्षक प्रविण कंदले यांनी फलक लेखन केले.
यासाठी राजकुमार देवकते, क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे, बसप्पा कुंभार, हरी ऐवळे यांनी परिश्रम घेतले.