उमाबाई श्राविका विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. हे व्याख्यान पोलीस आयुक्तालय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग आणि शहर तसेच बालकल्याण समिती सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आले.

कन्या न्यूज सेवा : सोलापूर, दि. 30 जून :
उमाबाई श्राविका विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. हे व्याख्यान पोली\स आयुक्तालय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग आणि शहर तसेच बालकल्याण समिती सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर शहर ) उपस्थित होते. सहशिक्षिका माधवी खोत यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांनी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी करू नये याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. मुली या खुप हळव्या असतात स समजूतदार असतात मोबाईलचा गैरवापर करू नये . दहावीनंतर आपण शिक्षणाचा योग्य मार्ग निवडला पाहिजे. त्या मार्गाने आपण आत्मविश्वासाने शिक्षण घेतले पाहिजे. कोणत्याही चुकीच्या मार्गाने न जाता योग्य निर्णय घेतले पाहिजेत. ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायच्या त्याच करायला हव्यात. मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी दामिनी पथकाचा वापर करावा. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.
या व्याख्यानासाठी मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक पौळ यांचेदेखील मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन खोत यांनी केले. आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.