३४० घरांच्या काही भागाचे होणार भूसंपादन

कन्या न्यूज सेवा: सोलापूर,दि. 1 ऑक्टोबर 2021-

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सोलापूर शहरात होणाऱ्या उड्डाणपूलासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाकरिता सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबतचा अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

जुना पुणे नाका ते विजयपूर रस्त्यावरील पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शहरात काही ठिकाणचे भूसंपादन करणे आवश्यक असून, महानगरपालिकेच्या दोन पथकांकडून हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर रोजी सुरू झालेले हे सर्व्हेक्षण गुरुवार. दि. ३० सप्टेंबर रोजी पूर्ण झाले. यासाठी प्रत्येकी ६ जणांचा समावेश असलेली दोन पथके कार्यरत होती. अवेक्षक श्रीकांत खानापुरे आणि अवेक्षक जावेद पानगल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले.

उड्डाणपूलासाठी वर उल्लेखलेल्या दोन्ही मार्गांवरील सुमारे ३४० मिळकतींचे भूसंपादन होणार आहे. उड्डाणपूलाची रुंदी सुमारे २७ ते २८ मीटर असणार आहे. आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या मार्गावर १७० तर जुना बोरामणी नाका या मार्गावर असलेल्या मिळकतींपैकी अंदाजे तितक्याच मिळकतींच्या काही भागाचे भूसंपादन होणार असल्याचे सांगण्यात आले.

उड्डाणपूलासाठी भूसंपादन सर्व्हेक्षण
शहरात होणाऱ्या उड्डाणपूलासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाकरिता सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचे छायाचित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact