दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना व आस्था रोटी बँकेच्यावतीने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीच्या वारकऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. साबण, तेल, पेस्ट, झेंडू बॉम, सरगम साबण असे एकूण ७00 जणांचे कीट व पाण्याचे बोटल वाटप करण्यात आले.

दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना व आस्था रोटी बँकेच्यावतीने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीच्या वारकऱ्यांना साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

कन्या न्यूज सेवा : सोलापूर, दि. ५ जुलै :  दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना व आस्था रोटी बँकेच्यावतीने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीच्या वारकऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. साबण, तेल, पेस्ट, झेंडू बॉम, सरगम साबण असे एकूण ७00 जणांचे कीट व पाण्याचे बोटल वाटप करण्यात आले.
श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन झाले पूर्व मंगळवार पेठ, भुसार गल्ली या ठिकाणी प्रथम श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पालखीतील वारकऱ्यांना शिवपुत्र बसवारुढ महाराज मठाधीश व दीपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष आनंद तालिकोटी, शिवानंद सावळगी, कल्याण शेटे, नागेश मंत्री, राम क्षिरसागर, अप्पासाहेब माळगे, सुहास छंचुरे यांच्या हस्ते पाण्याचे बोटल व कीट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी , सिद्धू बेऊर, पिंटू कस्तुरे, अनिल कपाळे, सूरज छंचुरे, शुभम पवार, उदय छंचुरे, गणेश ठेसे, विनायक घंटे, कामेश याळगी, शुभम पवार, सागर यलवार, प्रथमेश गावडे, बसवराज बेऊर, प्रथमेश व्हड्राव, रवी मास्तर, महेश दलसिंगे, शरण लिंगाडे, अमित भुमकर, वरद जट्टे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact