कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर २०२१-
बंगळुरू येथे होणार्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी आभा उज्ज्वल मलजी हिची महाराष्ट्र राज्य जलतरण संघात डायव्हिंग या प्रकारात निवड झाली आहे. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण निवड चाचणी स्पर्धेमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र संघात तिची निवड झाली आहे. सहत्रार्जुन प्रशालेचे शिक्षक डॉ.उज्ज्वल मलजी यांची ती कन्या आहे.
