शिवछत्रपती चषक’ निवड बुद्धिबळ स्पर्धा
कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. २४ फेब्रुवारी :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाज सेवा मंडळ, सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी दिवस व रात्र कनिष्ठ महाविद्यालय व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ‘शिवछत्रपती चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आदित्य गुंडला याने सहापैकी सहा गुण मिळवीत खुल्या गटात तर आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आरोही पाटील हिने महिला गटात चार पैकी चार गुण प्राप्त करत निर्विवादरित्या वर्चस्व राखत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मानस गायकवाडने व स्वराली हातवळणे यांनी स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले. मंगळवेढ्याच्या स्वप्निल हदगल (५ गुण – १९ बोकोल्स गुण) व आकाश तांबट (५ गुण – १८.५) व प्रज्वल कोरे (५ गुण – १८) यांनी अनुक्रमे कुल्या गटात तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. महिला गटात सृष्टी गायकवाड (३ गुण – ६), संकृती माने ( ३ गुण – ६) व वेदांकीता पाटील (२ गुण) यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य अनिल बारबोले यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्या सुजाता जुगदार, प्राचार्य आर. बी. शिंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन गावडे यांनी केले. यासाठी प्रा. गिरीश लोंढे, प्रा. अश्विन नागणे, प्रा. शंभूदेव गावडे, दत्ता सुतार, रोहन हावळे, प्रशांत राणे, विलास झरेकर यांनी परिश्रम घेतले.
प्रथम आलेल्या चार मुले व चार मुलींची निवड नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी झालेली आहे. विजेत्या खेळाडूंचे सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.

‘शिवछत्रपती चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडूंसमवेत प्राचार्य अनिल बारबोले, प्राचार्या सौ. सुजाता जुगदार, प्राचार्य आर. बी. शिंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा आदी