कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सांगोला यांच्या वतीने रविवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा सोसायटी सभागृह सांगोला येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा होणार आहे .

अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल (बापू ) कादे हे असतील. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राज्य संपर्कप्रमुख सुरेश पवार गुरुजी, राजेंद्र नवले (राज्य कार्याध्यक्ष ), दयानंद कवडे (अध्यक्ष , पुणे विभाग ), दत्तात्रय पोतदार (उपाध्यक्ष, पुणे विभाग ), भारत कुलकर्णी (माजी चेअरमन, जिल्हा सोसायटी ) तसेच मान्यवर जिल्हा शिक्षक समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित केला आहे .

यावेळी मुख्याध्यापक पदोन्नती पात्र शिक्षक बांधवांचा सन्मान, स्वच्छ शाळा,सुंदर शाळा स्पर्धेतील यशस्वी शाळांचा गौरव, निबंध स्पर्धेतील तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांकाच्या मानकरी शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडणार आहे. नवोदय विद्यालय व सैनिक स्कूलसाठी निवड झालेल्या शिक्षक पाल्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे.
तरी रविवार, दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा सोसायटी सभागृह सांगोला येथे हा कार्यक्रम होणार आहे .
तरी सत्कारमूर्ती सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक समिती प्रेमी सर्व शिक्षक बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact