महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे मागणीचे निवेदन

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-

महाराष्ट्र पद्मशाली युवक संघतनेच्या वतीने पाम वाईन नावाने सुरु होत असलेली ताडी दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी( महसूल) विठ्ठल उदमले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

हाराष्ट्र पद्मशाली युवक संघतनेच्या वतीने पाम वाईन नावाने सुरु होत असलेली ताडी दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी( महसूल) विठ्ठल उदमले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

या निवेदनाचा आशय असा की, सोलापूर जिल्ह्यात ताडीचे झाडे नाहीत. जिथे झाडे आहेत ते परिपक्व नाहीत. परिपक्व असलेल्या झाडांकडून वर्षाकाठी एकशे सत्तर लिटर ताडी मिळते. तसे पाहिल्यास अतिशय कमी प्रमाणात ताडी उपलब्ध होणार आहे. अशी परिस्थिती असताना शहरात किती शासनमान्य ताडी विक्री दुकाने सुरू करणार हा प्रश्न आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याने ताडीच्या झाडांची प्रत्यक्ष गणना केलेली नाही. त्यांची उपलब्ध कागदपत्रे पाहता शासनाने ताडी धोरण स्वीकारण्याच्या आधीच्या स्थितीची त्यांच्याकडे माहिती असल्याचे दिसून येते. वास्तविक ती खरी नाही त्यामुळे ताडीच्या झाडांची फेरगणना होईपर्यंत लिलाव स्थगित करावे.

ताडी झाडे ही पाम वर्गीय असल्याने ताडीलाच पाम वाईन असे नाव देण्यात आले आहे. सोलापुरातील मागील अनुभव पाहता झाडावरची ताडी मिळतच नाही. पण प्रत्यक्ष शासकीय दुकानांमध्ये मात्र भरपूर उपलब्ध होती. त्याच्या रासायनिक पथ्थकरणात क्लोरल हायड्रेटचे मिश्रण होते. त्याने अनेक लोक दगावले होते. त्यामुळेच शासनाला ताडी दुकाने बंद करावी लागली. महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष दत्तात्रय बडगु, खजिनदार शेखर इगे, हणमंतु श्रीराम, विश्र्वनाथ कट्टा, शिवसमर्थ गाजुल , विनित गजेली, चेतन कट्टा, इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *